मतदार यादीमुळे आत्महत्येचा प्रयत्न, ७० वर्षीय वृद्धाची प्रकृती गंभीर; म्हणाले…
बिहारसह देशभरात मतदार याद्यांमधील घोळ आणि आयोगाच्या SIR मोहिमेची चर्चा आहे. विरोधकांनी या मोहिमेला विरोध केला असला तरी आयोगाने पहिला टप्पा पूर्ण केला आहे. बिहारच्या परगणा जिल्ह्यात ७० वर्षीय खैरूल शेख यांनी मतदार यादीतील नावाच्या घोळामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमुळे त्यांना चिंता वाटत होती. SIR मुळे राजकीय वातावरण तापले आहे, ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांनी आयोगावर टीका केली आहे.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 