पंजाबमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; दुमजली इमारत जमीनदोस्त, ५ ठार
पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातील सिंगवाला गावात एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला आणि ३४ जखमी झाले. स्फोटामुळे दोन मजली इमारत कोसळली. बहुतांश कामगार बिहार व उत्तर प्रदेशचे होते. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट नाही, परंतु नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले असून जखमींची प्रकृती स्थिर आहे.