“ब्राह्मणांच्या फायद्यासाठी…”, ट्रम्प यांचे सल्लागार पुन्हा बरळले; भारतावर टीका चालूच!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावल्यामुळे भारतीयांमध्ये नाराजी आहे. त्यांच्या व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारतावर टीका करताना भारताला रशियाचे 'धुणीघर' म्हटले आहे. नवारो यांनी ब्राह्मणांच्या फायद्यासाठी सामान्य भारतीयांचे नुकसान होत असल्याचे विधान केले आहे. यामुळे अमेरिका-भारत संबंध तणावपूर्ण झाले आहेत. नवारो यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत भारताच्या रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर टीका केली आहे.