निळ्या ड्रमची दहशत, मेरठ नंतर आता लुधियानात आढळला पुरुषाचा मृतदेह
उत्तर प्रदेशातील सौरभ राजपूत हत्या प्रकरणानंतर आता पंजाबच्या लुधियाना येथे असाच एक प्रकार समोर आला आहे. निळ्या ड्रममध्ये एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. मृतदेहाचे पाय आणि मान बांधलेली असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.