देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य; “आपला वाद मराठी की हिंदी हा नाहीच..”
दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्ययन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्ययन केंद्र यांची कोनशिला ठेवण्यात आली. फडणवीस यांनी मराठी भाषेचं महत्त्व सांगत, ती संवादाचं माध्यम असल्याचं स्पष्ट केलं. मराठी साहित्य, नाट्यसृष्टीचं महत्त्व अधोरेखित करत, भारतीय भाषांचा अभिमान बाळगण्याचं आवाहन केलं. पानिपतच्या लढाईत मराठ्यांनी देशासाठी दिलेलं बलिदानही त्यांनी अधोरेखित केलं.