डोनाल्ड ट्रम्प आता इस्रायल-गाझा युद्ध थांबवणार; मांडला २० कलमी ‘प्लॅन ऑफ अॅक्शन’!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल व हमास यांच्यातील गाझा पट्टीतील संघर्ष थांबवण्यासाठी २० कलमी प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार, हमासने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची ७२ तासांत सुटका करावी लागेल आणि गाझा प्रशासनात हमासचा हस्तक्षेप थांबवावा लागेल. इस्रायलने प्रस्ताव मान्य केल्यास, इस्रायलचे सैन्य माघारी जाईल आणि युद्धकैदींची सुटका होईल. प्रस्ताव मान्य झाल्यास, गाझा नव्याने उभारले जाईल.