डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी; म्हणाले, “जोहरान ममदानी जर न्यूयॉर्कचे महापौर झाले तर…”
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी विजयी होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांचा विरोध करताना त्यांना स्वयंघोषित कम्युनिस्ट म्हटले आहे आणि ते निवडून आल्यास अनेक प्रश्न निर्माण होतील, असे म्हटले आहे. ममदानी यांनी ट्रम्प यांच्या विधानांना राजकीय नाटक म्हटले आहे. ममदानी यांचे पालक भारतीय असून ते युगांडात वाढले आहेत.