व्याजदरांबाबत RBI गव्हर्नर दास यांचं मोठं विधान; म्हणाले, “महागाई आटोक्यात येतेय, पण…”
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी फ्युचर ऑफ फायनान्स फोरम २०२४ मध्ये महागाई आणि व्याजदर धोरणाबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. त्यांनी महागाईचा दर ४% च्या आत आणण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. गेल्या १८ महिन्यांपासून व्याजदर जैसे थे ठेवले असून, यंदाही त्यात बदल होण्याची शक्यता नसल्याचे सूतोवाच त्यांनी दिले आहेत. आरबीआयने २०२४-२५ साठी विकासदराचा अंदाज ७.२% वर्तवला आहे.