माजी पंतप्रधानांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा ४७ वर्षीय महिलेवरील बलात्कार प्रकरणात दोषी
कर्नाटकच्या हासन लोकसभेचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. ४७ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने हा निकाल दिला. २ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावली जाईल.