माजी लष्कर प्रमुखांच्या ‘त्या’ पुस्तकाला सरकारची परवानगी मिळेना; वर्षभरापासून प्रतीक्षा!
देशाचे माजी लष्करप्रमुख निवृत्त जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या 'Four Stars of Destiny' पुस्तकाला केंद्राची परवानगी मिळालेली नाही. त्यांनी हे पुस्तक वर्षभरापूर्वी लिहून प्रकाशकांकडे दिलं होतं. संरक्षण मंत्रालयाने काही नोंदींवर आक्षेप घेतल्यामुळे परवानगी प्रलंबित आहे. पुस्तकात संवेदनशील लष्करी कारवाया आणि राजकीय घडामोडींचा उल्लेख आहे. नरवणे यांनी प्रकाशनाची जबाबदारी प्रकाशक आणि मंत्रालयावर सोडली आहे.