१००० डिग्री सेल्सिअस तापमानातही एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा काय सुरक्षित राहिला?
एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन एआय-१७१ विमानाला १२ जून रोजी अपघात झाला, ज्यात २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विमानाचा ब्लॅक बॉक्स बीजे मेडिकल महाविद्यालयाच्या गच्चीवर आढळून आला. ब्लॅक बॉक्समध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असतात, ज्यामुळे अपघाताचे कारण समजू शकते.