जगात सध्या किती किलो सोनं आहे माहिती आहे? ५० टक्के सोन्याचे तर फक्त…
भारतीय समाजात सण-उत्सव, लग्नसमारंभ आणि गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे सोन्याची मागणी आणि किंमत वाढली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत १ लाख ८७ हजार २०० टन सोनं खणून काढलं आहे. हे सोनं वितळवून ५ मायक्रॉन जाडीच्या तारेत बदलल्यास पृथ्वीला १ कोटी १२ लाख वेळा वेढता येईल. यातील ४९% सोनं दागिन्यांच्या स्वरूपात आहे.