एअर इंडियाचं विमान तांत्रिक बिघाडामुळे चेन्नईत उतरवलं, १०० प्रवाशांचा थोडक्यात वाचला जीव
एअर इंडियाच्या AI2455 विमानात तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानामुळे चेन्नईत उतरवण्यात आलं. खासदार केसी वेणुगोपाल, अडूर प्रकाश, के राधाकृष्णन, रॉबर्ट ब्रुस दिल्लीला जात होते. वेणुगोपाल यांनी सांगितलं की, टर्बुलन्स आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान चेन्नईत उतरवावं लागलं. पहिल्या लँडिंगवेळी दुसरं विमान असल्याने धोकादायक प्रसंग टळला. वेणुगोपाल यांनी डीजीडीसीएला तातडीने चौकशी करण्याचं आवाहन केलं.