उच्चवर्णीय मुलीवर प्रेम असलेल्या दलित तरुणाची कोयत्याचे वार करुन हत्या कुठे घडली घटना?
तामिळनाडूतील दलित सॉफ्टवेअर इंजिनिअर कवीन सेल्वा गणेश याची उच्चवर्णीय मुलीवर प्रेम केल्यामुळे हत्या करण्यात आली. टीसीएसमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय कवीनला सुबाशिनीच्या भावाने, सूरजीतने, कोयत्याने वार करून ठार मारले. सूरजीतचे आई-वडील पोलीस खात्यात आहेत. कवीनच्या कुटुंबाने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला असून, दलित संघटनांनी सूरजीतच्या आई-वडिलांनाही अटक करण्याची मागणी केली आहे.