“भारतानं मध्यस्थी कधी स्वीकारली नाही, स्वीकारणार नाही”; मोदींनी ट्रम्पना स्पष्टच सांगितलं
पहलगाम हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांच्या हत्येनंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला ठोस उत्तर दिलं. यानंतर युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचं जाहीर केलं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं की भारताने मध्यस्थी स्वीकारली नव्हती आणि स्वीकारणार नाही. मोदी आणि ट्रम्प यांच्यात विस्तृत चर्चा झाली, ज्यात मोदींनी ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली.