“प्रभू रामचंद्रांचं मानसिक संतुलन ढळलं आणि..”, प्रसिद्ध कवीच्या वक्तव्यामुळे नवा वाद
प्रसिद्ध तमिळ कवी वैरामुत्तू यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कवी कंबर यांच्या रामायणावर आधारित महाकाव्याला पुरस्कार मिळाल्यानंतर वैरामुत्तू म्हणाले की, कंबर यांनी रामाच्या उणी बाजू लपवून त्यांना देवत्व दिलं. भाजपाचे प्रवक्ते सीआर केशवन यांनी वैरामुत्तू यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप केला आणि माफी मागण्याची मागणी केली.