“माझी लाडकी मुलगी तर गेली आता…”; हुंड्यासाठी जाळून मारलेल्या निक्कीच्या आईची आर्त विनवणी
ग्रेटर नोएडामध्ये निक्की नावाच्या विवाहितेचा तिच्या पती विपिनने हुंड्यासाठी खून केल्याची घटना घडली आहे. निक्कीच्या वडिलांनी आरोपींचं एन्काऊंटर करण्याची मागणी केली आहे, तर तिच्या आईने दु:ख व्यक्त केलं आहे. निक्कीच्या बहिणीनेही सासरच्या लोकांकडून छळ झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात विपिनसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.