“दोन गोळ्यांचा आवाज आला आणि…”, दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात वाचलेल्या पर्यटकाचा अनुभव
पहलगाम दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ उडवली आहे. प्रसन्न कुमार भट, सॉफ्टवेअर इंजिनिअर, यांनी त्यांच्या पोस्टमध्ये हल्ल्याचा अनुभव सांगितला आहे. ते कुटुंबासह काश्मीरला गेले होते. हल्ल्याच्या वेळी त्यांच्या लष्करात असलेल्या भावाने प्रसन्न कुमार आणि त्यांच्या कुटुंबासह ३५-४० जणांचे प्राण वाचवले. गोळीबाराच्या आवाजात त्यांनी चिखलात लपून जीव वाचवला, अशी पोस्ट प्रसन्न कुमार यांनी केली आहे.