साध्वी प्रज्ञा यांनी नऊ महिन्यांपूर्वी केलेल्या पोस्टची पुन्हा चर्चा, “जगले वाचले तर…”
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष ठरवले. न्यायालयाने सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याचे नमूद केले. निकालानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी ९ महिन्यांपूर्वीच्या पोस्टची चर्चा झाली. निकालानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी न्याय मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आणि भगव्याला दहशतवादी ठरवणाऱ्यांना देश माफ करणार नाही, असे सांगितले.