सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप; “लाडकी बहीण योजनेत महाराष्ट्रात ४ हजार ८०० कोटींचा घोटाळा”
खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या योजनेत पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये महिलांच्या खात्यांऐवजी पुरुषांच्या खात्यांवर पैसे कसे गेले, निवडणुकीनंतर महिलांना वगळण्याचे कारण काय, यांचा समावेश आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देण्याची मागणी केली आहे.