तिहेरी हत्याकांडाने राजधानी हादरली, मुलानेच आई, वडील आणि भावाला संपवलं
दिल्लीतील साटबाडी गावात तिहेरी हत्याकांड घडले आहे. सिद्धार्थ नावाच्या तरुणाने आपल्या आई-वडील आणि भावाची हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले. सिद्धार्थने हाताची नस कापून घेतली होती आणि तो फरार झाला आहे. त्याच्यावर मानसोपचार सुरु होते. या घटनेने दिल्ली हादरली असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.