लाखो रुपये भरूनही अमेरिकेत डंकीमार्गे पोहोचलेल्या तरुणांची करुण कहाणी!
अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीय नागरिकांना अमेरिकेच्या लष्करी विमानाने माघारी पाठवले जात आहे. गोव्यातील दोन तरुणांनी फसवणूक झाल्याचे सांगितले. एजंटने त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून, मेक्सिकोमार्गे अमेरिकेत पाठवले. तिथे छळ सहन करावा लागला. अमेरिकन सीमा गस्त पथकाने पकडून २० दिवस डिटेंशन सेंटरमध्ये ठेवले. गोवा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.