Video: “भारतीयांनो, चालते व्हा”, ऑस्ट्रेलियात २३ वर्षीय भारतीयाला मारहाण; वर्णभेदातून…
ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेडमध्ये २३ वर्षीय भारतीय तरुण चरणप्रीत सिंगला वर्णभेदातून बेदम मारहाण करण्यात आली. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेत चरणप्रीतला गंभीर दुखापत झाली असून, त्याला रॉयल अॅडलेड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणाला अटक केली असून, इतर चौघांचा शोध सुरू आहे. चरणप्रीतने न्यायाची मागणी केली आहे.