“हा RSS च्या स्वयंसेवकांना भडकवण्याचा प्रयत्न”, व्यंगचित्रकारावर आरोप!
इंदोरमधील व्यंगचित्रकार हेमंत मालवीय यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) अवमान करणारी व्यंगचित्रं सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विनय जोशी यांनी तक्रार दाखल केली असून, मालवीय यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी प्रशासनातील त्रुटींवर बोट ठेवल्यामुळे आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याचं म्हटलं आहे. पोलिस तपास सुरू आहे.