डेटिंग अॅपवर ओळख, हॉटेलवर लैंगिक संबंध आणि तरुणावर बलात्काराचा खटला; न्यायमूर्ती म्हणाले…
कर्नाटक उच्च न्यायालयाने एका डेटिंग अॅपवर भेटलेल्या तरुण-तरुणीच्या बलात्कार प्रकरणात तरुणाच्या बाजूने निकाल दिला. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या व्याख्येचा उल्लेख करून, परस्पर सहमतीने झालेल्या संबंधांना गुन्हा ठरवता येणार नाही असे नमूद केले. तसेच, तपास अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरील चॅट्सकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांना सुनावले. न्यायालयाने आरोपीविरोधातील गुन्हा रद्द केला.