उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर कोसळून सात जणांचा मृत्यू, अपघात नेमका कसा झाला?
उत्तराखंडमध्ये केदारनाथकडे जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन सात जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर देहरादूनहून निघाले होते आणि गौरीकुंड-त्रिजुगीनारायण दरम्यान कोसळले. दाट धुकं आणि कमी दृश्यता यामुळे अपघात झाला असावा. मागील दोन महिन्यांत उत्तराखंडमध्ये ही चौथी हेलिकॉप्टर अपघाताची घटना आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे.