“ती मुलगी गेलीच नसती तर तिच्यावर बलात्कार…”; तृणमूलच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
कोलकाता येथील विधी महाविद्यालयात एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, आरोपींच्या फोनमध्ये गुन्ह्याचा व्हिडिओ सापडला आहे. तृणमूलचे आमदार मदन मित्रा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. भाजपाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याची मागणी केली आहे.