विद्यापीठात घुसून तरुणीवर अत्याचार; महिला न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा
अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ए ज्ञानशेखरनला चैन्नईतील महिला न्यायालयाने ३० वर्षांची जन्मठेप आणि ९० हजारांचा दंड ठोठावला आहे. डिसेंबर २०२४ मध्ये घडलेल्या या घटनेनंतर फास्ट ट्रॅकवर खटला चालवून न्याय मिळवण्यात आला. ज्ञानशेखरनवर ११ आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले असून, १०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायाधीशांनी त्याला जास्तीत जास्त शिक्षा दिली.