‘लोकपाल’मधील ७ सदस्यांना हव्यात ५ कोटींच्या BMW कार; अत्याधुनिक मॉडेलसाठी निविदा!
१३ वर्षांपूर्वी अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे स्थापन झालेल्या लोकपाल संस्थेने भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. सध्या लोकपाल BMW कार्सच्या मागणीमुळे चर्चेत आहे. लोकपालने सात सदस्यांसाठी BMW 330Li सीरिजच्या कार्सची मागणी केली आहे, ज्यांची किंमत ५ कोटींहून अधिक आहे. निविदा भरण्याची अंतिम मुदत ६ नोव्हेंबर असून, ७ नोव्हेंबर रोजी निविदा उघडल्या जातील.