बायकोची हत्या करून मृतदेह घरात पुरला, १२ दिवस पती त्यावरच झोपला; तपासात कारण आलं समोर!
उत्तर प्रदेशच्या बाहरीच भागात ४८ वर्षीय हरीकिशनने पत्नी फूलादेवीची हत्या करून मृतदेह गादीखाली पुरला. १२ दिवसांनंतर फूलादेवीच्या भावाने संशय आल्याने पोलिसांना कळवले. पोलिसांनी तपास करून मृतदेह शोधला. हरीकिशनने विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी हरीकिशनला बाराबंकी परिसरातून अटक केली असून त्याच्यावर हत्या व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.