“३०-४० वर्षे भारतात राहिलेल्या विवाहित महिलांनी कुठे जायचं?” मेहबुबा मुफ्तींचा सवाल
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी भारतीयांशी लग्न केलेल्या आणि अनेक वर्षांपासून येथे राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन सरकारला केले आहे. त्यांनी गृहमंत्रालयाला दयाळू दृष्टीकोन दाखवण्याची विनंती केली आहे. मुफ्ती म्हणाल्या की, अशा नागरिकांना हद्दपार करणे अमानवीय आहे आणि त्यांच्या कुटुंबांना त्रास देण्यासारखे आहे.