‘उडत्या शवपेट्या’ नावाने बदनाम झालेले मिग – २१ लढाऊ विमान निवृत्त होणार!
भारतीय हवाई दलाचे मिग-२१ लढाऊ विमान सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार आहे. १९६२ पासून मिग-२१ विमानांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. मात्र, तांत्रिक सुधारणा असूनही, अपघातांमुळे त्यांची कार्यक्षमता प्रश्नांकित झाली. भारतीय बनावटीच्या एलसीए तेजस एमकेवनए विमानांच्या विलंबामुळे मिग-२१ची निवृत्ती लांबली होती. आता शेवटचे मिग-२१ बायसन विमान निवृत्त होणार आहे.