मॉडेल शीतलच्या हत्या प्रकरणात तिच्या बॉयफ्रेंडला अटक, पोलिसांसमोर दिली गुन्ह्याची कबुली
हरियाणातील सोनिपत येथे हरियाणवी मॉडेल शीतलचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला. तिचा बॉयफ्रेंड सुनीलला अटक करण्यात आली असून त्याने गुन्हा कबूल केला आहे. सुनील विवाहित असून त्याने शीतलसोबत भांडणानंतर तिची हत्या केली. १४ जूनला शीतल पानिपत येथे शूटसाठी आली होती. सुनीलने तिला मारहाण करून तिचा खून केला आणि मृतदेह कालव्यात फेकला. १७ जूनला पोलिसांनी सुनीलला अटक केली.