“हिंदू शब्दावर कोणाचा आक्षेप असेल तर…”, मोहन भागवतांचं वक्तव्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सव नागपूर येथे साजरा झाला. सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, आंतरराष्ट्रीय धोरणं, आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी हिंदू शब्दावर आक्षेप घेणाऱ्यांसाठी पर्यायी शब्द सुचवले. भागवत म्हणाले, भारतीय संस्कृती सर्वसमावेशक आहे आणि तीच आपली राष्ट्रीयता आहे. हिंदू समाज 'वसुधैव कुटुंबकम' या विचारसरणीचा प्रवर्तक आहे.