काळी बाहुली ठेवली आणि ५२ कोटींचं सोनं लंपास केलं; कर्नाटकमध्ये कॅनरा बँकेत दरोडा!
कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील मानागुली भागातील कॅनरा बँकेत २३ मे रोजी झालेल्या दरोड्यात ५२ कोटींचं सोनं चोरीला गेलं. दरोडेखोरांनी ५१ किलो सोन्याचे दागिने लंपास केले. त्यांनी बनावट चाव्या, अलार्म बंद करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बंद करणे आणि एनव्हीआर घेऊन जाणे यांसारख्या सुनियोजित पद्धतीने हा दरोडा टाकला. पोलिसांनी आठ पथकं नियुक्त केली असून तपास सुरू आहे.