आणीबाणीच्या काळात १.०७ कोटींहून अधिक लोकांची झाली नसबंदी
१९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी सरकारने १.०७ कोटींहून अधिक लोकांची नसबंदी केली, हे प्रमाण सरकारच्या लक्ष्यापेक्षा ६० टक्के अधिक होते. शाह आयोगाने या काळातील गैरप्रकारांची चौकशी केली. अहवालानुसार, ५४८ अविवाहितांची नसबंदी करण्यात आली आणि हे करताना १,७७४ मृत्यू नोंदवले गेले. महाराष्ट्रात सर्वाधिक १४.४ लाख नसबंदी झाल्या.