मुंबई ते अहमदाबाद प्रवास फक्त १२७ मिनिटांत, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
भारताची पहिली बुलेट ट्रेन सेवा लवकरच मुंबई-अहमदाबाद मार्गावर सुरू होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भावनगर येथील कार्यक्रमात ही माहिती दिली. ही सेवा सुरू झाल्यावर मुंबई-अहमदाबाद प्रवास फक्त २ तास ७ मिनिटांत होईल, असे ते म्हणाले.