छट महापर्वाला UNESCO टॅग मिळवणार, सरकारचे प्रयत्न; नरेंद्र मोदींची बिहारमध्ये घोषणा!
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी बिहारमध्ये भाजपावर टीका करताना भाजप सणांचा वापर मतांसाठी करत असल्याचा आरोप केला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर देत छट पूजेला UNESCO चा टॅग मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मोदींनी काँग्रेस व राजदवरही हल्ला चढवला. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू असून ६ व ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.