नेपाळमध्ये राजकीय भूकंप, पंतप्रधान केपी शर्मा ओलींचा राजीनामा; देशभर वातावरण तापलं
नेपाळमधील राजकीय स्थिती तणावपूर्ण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून Gen Z आणि तरुणाईने नेपाळ सरकारविरोधात आंदोलन केले आहे. सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातल्याचा निषेध करत १९ तासांनी ही बंदी उठवावी लागली. तरीही तरुणाईचा असंतोष कमी झाला नाही. वाढत्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे.