Ahmedabad Plane Crash : संसार सुरु होण्याआधीच संपला! खुशबूचा विमान अपघातात मृत्यू, नवऱ्याला भेटण्याचं स्वप्न अधुरंच
अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाचा टेक ऑफनंतर पाच मिनिटांत अपघात झाला. या दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, ज्यात राजस्थानची नवविवाहिता खुशबूही होती. खुशबू पहिल्यांदाच पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती. अपघातामुळे मृतदेह जळून खाक झाले असून ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जाणार आहे. जखमींवर अहमदाबाद रुग्णालयात उपचार सुरू आहेत.