Video:झोहरान ममदानींची पुन्हा मोदींवर टीका; म्हणाले, “फक्त विशिष्ट गटातल्या भारतीयांनाच
न्यूयॉर्कच्या मेयरपदाच्या निवडणुकीत आघाडीवर असलेले झोहरान ममदानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी मोदींना 'युद्ध गुन्हेगार' म्हटले असून, भाजपाच्या धोरणांवर टीका केली आहे. ममदानी म्हणाले की, मोदींच्या धोरणांमध्ये फक्त विशिष्ट गटातल्या भारतीयांनाच स्थान आहे. त्यांनी विविधतेचा पुरस्कार केला आणि मोदी समर्थकांचंही प्रतिनिधित्व करण्याचं आश्वासन दिलं. याआधीही त्यांनी मोदींवर गुजरात दंगलींवरून टीका केली होती.