“या देशात दलितांना…”, सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याप्रकरणी खरगेंची संतप्त प्रतिक्रिया
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याने देशभरात खळबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी याची दखल घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या घटनेवर भाष्य केले आणि उत्तर प्रदेशमधील बरेली येथे दलित व्यक्तीच्या लिंचिंगबद्दल संताप व्यक्त केला. खरगे यांनी सामान्य लोकांचे भवितव्य काय असेल?, असा सवाल उपस्थित केला.