बिहारच्या मतदार यादीत पाकिस्तानी महिलेचं नाव, SIR प्रक्रियाही सुफळ संपूर्ण
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान भागलपूर जिल्ह्यात पाकिस्तानी महिलेचं नाव मतदार यादीत आल्याने खळबळ उडाली आहे. गृह मंत्रालयाच्या तपासात तीन पाकिस्तानी नागरिक भारतात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही राहत असल्याचं आढळलं. यातील दोन महिलांनी मतदान ओळखपत्र आणि आधारकार्ड तयार केले आहेत. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, जसे की त्यांनी भारतीय कागदपत्रं कशी मिळवली आणि त्यांना कोणाची मदत मिळाली?