नेपाळमधील जाळपोळीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, आंदोलक तरुणांना केलं ‘हे’ आवाहन!
गेल्या चार दिवसांपासून नेपाळमध्ये प्रचंड उलथापालथी झाल्या आहेत. सोशल मीडियावरील बंदीवरून सुरू झालेलं Gen Z तरुणांचं आंदोलन देशभर पसरलं आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली व राष्ट्रपतींनी राजीनामा दिला. संसद, सर्वोच्च न्यायालय आणि इतर महत्त्वाच्या इमारती जाळल्या गेल्या. पंतप्रधान मोदींनी नेपाळमधील हिंसाचारावर दुःख व्यक्त करत शांततेचं आवाहन केलं. नव्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत.