नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्कींना मोदींचा पहिला फोनकॉल; म्हणाले..
नेपाळमध्ये राजकीय उलथापालथीनंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की हंगामी पंतप्रधान झाल्या असून, पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला. मोदींनी आंदोलनातील मृत्यूबद्दल सहवेदना व्यक्त केली आणि नेपाळच्या शांततेसाठी भारताच्या पाठिंब्याचे आश्वासन दिले. नेपाळमध्ये सहा महिन्यांत निवडणुका होणार असून, भारताने या बदलाचे स्वागत केले आहे.