“आता पाकिस्तानला कळेल…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावलं; म्हणाले, “भारत घरात घुसून…”
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांनी स्टॅच्यु ऑफ युनिटीला आदरांजली वाहिली आणि एकतेची शपथ घेतली. भाषणात मोदींनी पाकिस्तानवर टीका केली आणि काँग्रेसवर सरदार पटेलांचे विचार विसरण्याचा आरोप केला. त्यांनी नक्षलवादाविरोधात कठोर कारवाई केल्याचे सांगितले आणि पूर्वीच्या सरकारांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात टाकल्याची टीका केली.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 