कुमार विश्वास यांच्या पत्नीवर गैरव्यवहाराचे आरोप, मंजू शर्मांचा RPSC सदस्यत्वाचा राजीनामा
राजस्थान उच्च न्यायालयात चालू असलेल्या RPSC परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या पत्नी मंजू शर्मा यांचे नाव आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी RPSC सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मंजू शर्मा यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, त्यांच्या विरोधात कोणतेही प्रकरण प्रलंबित नाही आणि त्यांनी नेहमीच पारदर्शकतेला प्राधान्य दिले आहे.