‘ऑपरेशन सिंदूर’ चालू असताना पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्याला पंजाबमधून अटक!
पंजाबच्या तर्नतरण जिल्ह्यात पंजाब पोलिसांनी गगनदीप सिंग उर्फ गगन याला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. गगनदीप सिंगचा पाकिस्तानच्या आयएसआयशी संपर्क होता आणि त्याला याबदल्यात पैसे मिळत होते. पोलिसांनी त्याच्या मोबाईलमध्ये ISI शी निगडित २० व्यक्तींचे क्रमांक सापडले आहेत.