पाऊण तासाची पत्रकार परिषद, ७ दिवसांचा अल्टिमेटम; शेवटी राहुल गांधींनी केली ‘ही’ मागणी!
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. कर्नाटकमधील २०२३ निवडणुकीत मत चोरी झाल्याचा दावा करत, त्यांनी पुरावे सादर केले. मतदार यादीतून नावं वगळण्यासाठी बाहेरील मोबाईल क्रमांक वापरल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाने आठवड्याभरात माहिती जाहीर करावी, अन्यथा घोटाळेबाजांना वाचवत असल्याचं सिद्ध होईल, असा अल्टिमेटम दिला.