लालू प्रसाद यादव यांनी मोठ्या मुलाची पक्ष आणि कुटुंबातून केली हकालपट्टी
राष्ट्रीय जनता दल (RJD) पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. तसेच त्यांना कुटुंबातूनही बेदखल केल्याचे सांगितले. बेजबाबदार वर्तन आणि कौटुंबिक मूल्ये तसेच सार्वजनिक जीवनातील शिष्टाचारापासून विचलित झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे लालू प्रसाद यादव यांनी एक्सवर पोस्टद्वारे स्पष्ट केले.